मंगळवारी होणार शिवेसेनेची यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 20:52 IST2017-01-29T20:52:15+5:302017-01-29T20:52:15+5:30
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा यांची युती तुटली आहे.

मंगळवारी होणार शिवेसेनेची यादी जाहीर
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा यांची युती तुटली आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर संपूर्ण ताकदीने शिवसेना लढणार असून, येत्या मंगळवारी पालिका उमेदवारांची यादी शिवसेनेकडून जाहीर केली जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी चौधरी रविवारी(२९) शहरात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, चौधरी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दाखविली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यरत असून पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपाच्या उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा द्यायचा की नाही, हे पक्षप्रमुख ठरवतील.