शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वरातीमधील घोडयाची लाथ बसून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:06 IST

माढा तालुक्यातील अंजनगांव खेलोबा येथील घटना

ठळक मुद्दे- माढा तालुक्यातील अंजनगांव खेलोबा येथील घटना- तरूणाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू- या घटनेने अंजनगांव खेलोबा गावावर शोककळा

माढा : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे लग्नाच्या वरातीमधील घोडा बिथरल्याने घोड्याने मालकाच्या हाताला हिसका देऊन तरूणाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला. अनिल गुंडीबा गायकवाड (वय ४४) असे धडकेत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अनिल गायकवाड हा गावातील किसन त्रिंबक वाघमाडे यांचा मुलगा नामदेव याचा विवाह २९ मे रोजी दुपारी तीन वाजता होता. नवरदेवाची वरात गावामध्ये आली व नवरदेव ग्रामदैवताच्या दर्शनाला मंदिरात गेल्यावर बँडच्या तालावर घोडा नाचवत असताना उन्हाचे तापमान वाढले होते. त्यातच अचानक घोडा बिथरला मालकाच्या हातातून निसटून अनिल गायकवाड यांना घोड्याने धडक दिली़ घोड्याची लाथा लागल्याने जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी सोलापूरला दवाखान्यात पाठविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. मागील काळात त्याच्या रिक्षामध्ये राहिलेली पैशाची बॅग त्याने परत केली होती, त्यामुळे त्याचा प्रामाणिक रिक्षावाला म्हणून परिसरात ओळख देखील निर्माण झाली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई-वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातmarriageलग्नSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस