शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याप्रकरणी एसआयटी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:08 PM

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना या पथकात पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ञांचा समावेश असणार तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सर्व्हर सारखा प्रॉक्सी स्वीच बनवून त्याद्वारे हॅकरने हल्ला चढवत व्हिसा व रूपे डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची लुटण्यात आले होते. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एकत्रित विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे़ या पथकात पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ञांचा समावेश असणार आहे. दरम्यान, कोल्हापूरातून काही पैसे काढण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक कोल्हापुरात रवाना झाले आहे़.कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून चोरटयांनी कोट्यावधी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, ६ पोलीस कर्मचारी तसेच सायबर गुन्हे विषयक तज्ञांचा समावेश राहणार आहे़ याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांकडून काही तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सायबर हल्ला करणाऱ्या चोरट्याने बँकेच्या खात्यातील रक्कम हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली आहे. तसेच परदेश आणि देशातील काही खात्यातून काही रक्कम काढण्यात आली आहे.  कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. कोल्हापुरातून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे़.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसbankबँकfraudधोकेबाजी