शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडक्या बहिणीं’ना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच! आचारसंहितेमुळे निधी तूर्तास थांबविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:48 IST

डिसेंबरपासून योजनेचे पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना तत्काळ थांबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून अशा योजना थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने ही योजना थांबविण्याचा निर्णय घेतला.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आचारसंहितेनुसार राज्यातील आर्थिक लाभाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानुसार महिला व बालविकास विभागातर्फे सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी आढावा घेतला. मात्र, या योजनेच्या निधी वितरणाचे काम यापूर्वीच थांबविल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने आयोगाला दिली.

निम्म्या महिलांना मिळाले योजनेचे पैसे

महिला व बालविकास विभागाच्या  माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये २ कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले. राज्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख आहे. म्हणजे एकूण महिला मतदारांपैकी पन्नास टक्के महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता देता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊनच सरकारने आगाऊ हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे.

२ महिन्यांचे ३ हजार जमा

योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली असली तरी मतदानाच्या आधीच लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळतील याची काळजी सरकारने घेतली होती. त्यानुसार ऑक्टोबरचा लाभ देताना नोव्हेंबरचा हप्ताही सरकारने आगाऊ दिला. त्यामुळे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये याच महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मिळाले आहेत.

आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा प्रश्नच नाही. आम्ही नोव्हेंबरचे पैसे ॲाक्टोबरमध्येच दिले. योजनेवर आम्ही जो निर्णय घेतला तो निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेतला नाही. बहीणींना कायमस्वरुपी पैसे मिळावे ही भावना ठेवून हा निर्णय घेतला. म्हणून ॲाक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे दिले.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४