पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्या बहिणींचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 18:31 IST2016-10-26T18:31:10+5:302016-10-26T18:31:10+5:30

घराच्या गच्चीवर खेळत असताना पाण्याच्या हौदात बुडून दोन चिमुकल्या बहिणींचा करुण अंत झाल्याची घटना

Sister's end in the water tank | पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्या बहिणींचा करुण अंत

पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्या बहिणींचा करुण अंत

>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 26 - घराच्या गच्चीवर खेळत असताना पाण्याच्या हौदात बुडून दोन चिमुकल्या बहिणींचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथे घडली. 
खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील श्रीकृष्ण वासुदेव लोखंडे यांच्या कु. लक्ष्मी (वय ३ वर्ष) व कु. हर्षाली (वय २ वर्ष) या दोघी बहिणी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराच्या गच्चीवर खेळत होत्या. खेळता खेळता दोघीही पाण्याच्या टाकीत पडल्या. त्यावेळी वडील श्रीकृष्ण लोखंडे हे घरातच होते,  पाण्याच्या टाकीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने ते गच्चीवर गेले असता त्यांना दोन्ही मुली पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसले. तात्काळ त्यांनी दोन्ही मुलींना बाहेर काढून उपचाराकरीता बाळापूर येथे रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषीत केले. श्रीकृष्ण लोखंडे यांना दोनच मुली होत्या. चिमुकल्यांच्या अशा मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sister's end in the water tank