- पळसपाणी येथील घटना
साकोली (भंडारा) : पोहायला गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पळसपाणी येथे उघडकीला आली. वेदीका संतोष राऊत (५) व रुपेश सुभाष राऊत (५) असे मृत पावलेल्या बहिण-्भावाचे नाव आहे. या घटनेने पळसपाणी येथे शोककळा पसरली.माहितीनुसार, सकाळच्या सुमारास राऊत कुटंूबातील सदस्य शेत कामासाठी बाहेर गेले. घरात फक्त मुलांची आजी होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास खेळण्यासाठी दोन्ही मुले घराबाहेर पडली. घराशेजारीच गावतलाव आहे. खेळता खेळता दोन्ही बालके पोहण्यासाठी तलावात उतरली. यात दोघांचा बुडून करुण अंत झाला. सायंकाळ झाल्यावरही दोघेही घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरु झाला. दरम्यान तलावाच्या पाळीवर बालकांचे कपडे आढळले. संशयावरुन तलावात बालकांचा शोध घेण्यात आला. यात प्रथम रुपेशचा मृतदेह आढळला. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास वेदीकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तलावपाळीवर नागरिकांची गर्दी होती. वृत्त लिहीपर्यंत साकोली पोलिसांची पंचनाम्याची कारवाई सुरु होती. (तालुका प्रतिनिधी)