शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कंडक्टर भावाला सुट्टी न मिळाल्याने बहिणीने एसटीमध्येच साजरी केली भाऊबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 03:02 IST

रात्री साडेनऊला संजय यांनीही भोर फाट्याजवळ येताच बहिणीला फोन केला. गाडी भोर फाटा येथे थांबताच, बहीण वैशाली या भावाच्या औक्षणासाठी ओवाळणीचे ताट घेऊन चक्क गाडीमध्ये आल्या.

प्रदीप शिंदे कोल्हापूर : कोल्हापूर आगारात वाहक (कंडक्टर) असलेल्या आपल्या भावाचे औक्षण बहिणीने चक्क एस.टी. बसमध्ये केले. भोर फाटा येथे मंगळवारी प्रवाशांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या अनोख्या भाऊबीजेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.प्रवाशांच्या आनंदासाठी दिवाळी सणापासून एस.टी.चे अधिकारी, चालक, वाहक व अन्य कर्मचारी नेहमीच वंचित राहतात. सध्या एस.टी. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे. जादा काम लागत असले तरी सणाच्या कालावधीत प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्याच्या अनोखा आनंद चालक व वाहकांना वाटत असतो.

पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील संजय आनंदा कुंभार हे कोल्हापूर आगारात वाहक आहेत. दिवाळीनिमित्त वैशाली राजेंद्र कुंभार ही त्यांची धाकटी बहीण भोर (जि. पुणे) येथून माहेरी येते. काही कारणास्तव यंदा तिला दिवाळीला येता आले नाही. दोन दिवसांपासून भाऊ संजय यांना भाऊबीजेनिमित्त सासरी येण्यासाठी वैशाली या फोन करत होत्या. मात्र, नोकरीमुळे भाऊबीजेला येता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाऊबीजेदिवशी संजय यांना पुणे मार्गावरील ड्यूटी लागली. दुुपारी चारपर्यंत भावाची वाट पाहून वैशाली यांनी संजय यांना फोन करून ‘भाऊ, तू आज येतोस ना?’ असे विचारले. संजय यांनी ‘मी पुण्याला जात आहे; त्यामुळे येता येणार नाही,’ असे सांगितले तेव्हा बहिणीने ‘भोर फाट्याजवळ येताना फोन कर,’ असे सांगितले.

रात्री साडेनऊला संजय यांनीही भोर फाट्याजवळ येताच बहिणीला फोन केला. गाडी भोर फाटा येथे थांबताच, बहीण वैशाली या भावाच्या औक्षणासाठी ओवाळणीचे ताट घेऊन चक्क गाडीमध्ये आल्या. संजय यांच्यासह गाडीतील अन्य प्रवाशांना काहीच कळले नाही. वैशाली यांनी भाऊ संजय यांचे औक्षण केले. चालक बुरहान मोमीन यांचेही त्यांनी औक्षण केले. काही क्षणांतच गाडी पुण्याकडे निघाली. ही अनोखी भाऊबीज पाहून अन्य प्रवाशांच्याही डोळ्यांत पाणी आले. काही प्रवाशांनी या प्रसंगाचा फोटो तत्काळ सोशल मीडियावर टाकला. या अनोख्या भाऊबीजेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.बहीण वैशाली फराळाचा डबा घेऊन येईल, असेच वाटत होते. मात्र, तिने गाडीत येऊन चक्क औक्षण केले. ही भाऊबीज माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहील. - संजय कुंभार, वाहक, कोल्हापूर आगार