शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

साहेब, लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही, तरुणाचा आमदाराला फोन; उत्तर ऐकलं तर हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:00 IST

लग्नासाठी मुलगी मिळत नाही त्यामुळे तरूणानं त्याची व्यथा थेट आमदाराला फोन करून मांडली.

औरंगाबाद - अलीकडेच महाराष्ट्रात काही तरुणांनी नवरदेव मोर्चा काढून लक्ष वेधून घेतले होते. लग्नासाठी मुली देत नाही म्हणून तरुणांनी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एका तरुणाची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात एका तरुणानं थेट आमदाराला फोन करून लग्नासाठी कुणी मुलगी देत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाच्या समस्येला आमदारांनी दिलेले उत्तर पाहून तुम्हीही हसाल. 

नेमका काय आहे हा संवाद? तरूण - हॅलो, साहेब जय महाराष्ट्रआमदार - जय महाराष्ट्रतरूण - रत्नपूरहून विजय होळकर बोलतोय, ग्रामीणमधूनआमदार - बोला, बोलातरूण - काय निवांत का? आमदार - नाही, एकाठिकाणी बसलोयतरूण - साहेब, असा विषय होता, ८-९ एकर जमीन आहे. घरी चांगली परिस्थिती आहे. पण इथं कुणी मुलगीच द्यायला तयार नाही. आमदार - कुठं?तरूण - रत्नपूर, खुलताबाद, भद्रा मारूतीजवळआमदार - तुमचा बायोडाटा पाठवून द्यातरूण - रत्नपूरपासून ६ किमी गाव आहे. परिस्थिती चांगली आहे. आमदार - बायोडाटा पाठवून द्या. तरूण - तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत साहेबआमदार - बरं बरं ठीक आहे, बोलतो

या ऑडिओ क्लीपमधील आमदार उदयसिंह राजपूत असल्याचं बोललं जात आहे. सध्या ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोलापूरात तरूणांनी काढला होता अनोखा मोर्चाराज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्यामुळे आईबापाची काळजी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारने योग्य धोरण राबवावे या मागणीसाठी अलीकडेच लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नवरदेवांचा मुंडवळ्या बांधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेले मुलं लग्नातील नवरदेवासारखी नटली होती. त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात शेकडो अविवाहित मुलं सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या मोर्चाने सोलापूरकरांचे लक्ष वेधले. या मोर्चाचे नेतृत्व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी केले होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न