लहान मुलाचा वापर करून सिन्नरला सशस्त्र दरोडा, तीन जखमी
By Admin | Updated: August 30, 2016 16:16 IST2016-08-30T16:16:22+5:302016-08-30T16:16:22+5:30
सिन्नरमधील काळे मळ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. या दरोडेखोरांनी सोन्याच्या २ पोत, ३ मोबाईल आणि कपाटातील १ हजाराची रोख रक्कम घेऊन पलायन केले.

लहान मुलाचा वापर करून सिन्नरला सशस्त्र दरोडा, तीन जखमी
>- ऑनलाइन लोकमत
नाशिक. दि. 30 - सिन्नरमधील काळे मळ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात नगरपालिका कर्मचारी दिनकर श्रीधर काळे (५५), योगेश दिनकर काळे (३३) निलेश दिनकर काळे हे जखमी झाले आहेत. या दरोडेखोरांनी सोन्याच्या २ पोत, ३ मोबाईल आणि कपाटातील १ हजाराची रोख रक्कम घेऊन पलायन केले.
काळे कुटुंबिय झोपेत असताना पहाटे अडीचच्या सुमारास १२- १३ वर्षांच्या मुलासह चार दरोडेखोर काळे यांच्या घरात घुसले. घरातील पंखा सुरू असल्याने काळे कुटुंबियांना दरोडेखोरांची चाहूल लागली नाही. दरोडोखोरांनी दरवाजाशेजारील खिडकीचे गज कापून सोबत असलेल्या मुलास घरात घुसवून दरवाजा उघडण्यास सांगितले व त्यानंतर या दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून काळे कुटुंबियांना काठी, टिकाव, चाकूने मारहाण सुरू केली.
दरम्यान, हे दरोडेखोर हिंदी बोलत होते. त्यांचे तोंड बांधलेले होते व त्यांनी टी-शर्ट घातलेला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.