शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

"१६ वेळा दगड मारून बाळाची नाळ तोडताना एकच विचार केला की अशी वेळ…," 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:06 IST

सिंधुताई सपकाळांनी सांगितली होती 'अशी' आठवण, जे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले.

Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर होता. परंतु त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलेल्या एका आठवणीनं सर्वांचेच डोळे पाणावले.

"जगा पुढे जा, पण मागे वळून पाहा. एक लक्षात ठेवा. फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहित असतं, वेदना माहित नसतात. या रस्त्यानं चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय इतके मजबूत करा की एक दिवस ते काटे तुम्हाला सांगतील सुस्वागतम," असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना सल्ला दिला होता. 

"मी स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी, भिकाऱ्यांसोबत राहणारी मी, जन्म दिलेल्या बाळाची १६ वेळा दगड मारून नाळ तोडताना एकच विचार केला होता की सिंधुताई सपकाळ अशी वेळ कोणावर येऊ नये आणि आली तर तिच्यासोबत तू असली पाहिजे," अशी आठवणही त्यांनी सांगितली होती. "भूक लागल्यावर दुसऱ्यांच्या भूकेपर्यंत पोहोच म्हणजे तुझी भूक कमी होईल, असाही विचार केला होता," असं त्यांनी सांगितलं होतं.

खंत बाळगू नका जगायला शिका, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला होता. "मी २२ देशांमध्ये जाऊन आले. कधी नऊवारीतली मी २२ देशांत जाईन असं वाटलंही नव्हतं. शिका पुढे जात राहा, पण मागेही वळून पाहात राहा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गरीबी वाईट असते परंतु गरीबांपर्यंत पोहोचा," असाही सल्ला त्यांनी दिला होता.

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळMaharashtraमहाराष्ट्र