सिंधुदुर्ग: करुळ घाटाने आणले गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न, कड्याचा काही भाग कोसळला; अडीच तासानंतर एकेरी वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:27 IST2017-08-24T19:26:06+5:302017-08-24T19:27:24+5:30
कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गात येणा-या गणेशभक्तांसह अन्य प्रवाशांच्या मार्गात करुळ घाटाने काही काळ विघ्न आणले.

सिंधुदुर्ग: करुळ घाटाने आणले गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न, कड्याचा काही भाग कोसळला; अडीच तासानंतर एकेरी वाहतूक सुरू
वैभववाडी(सिंधुदुर्ग), दि.24 - कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गात येणा-या गणेशभक्तांसह अन्य प्रवाशांच्या मार्गात करुळ घाटाने काही काळ विघ्न आणले. सह्याद्री पट्ट्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दुपारी 12.30 च्या घाटातील कड्याचा काही भाग ढासळून रस्त्यावर कोसळला. त्यामुळे करुळघाटमार्ग पुर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे काही वाहनचालकांनी भुईबावडा घाटाचा पर्याय निवडला. तर बरेचशी वाहने करुळ घाटात अडकून पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नांमुळे सुमारे अडीच तासांनी एकेरी वाहतूक सुरु झाली. कोसळलेले दगड अवाढव्य असल्याने तुर्तास एकेरी वाहतूक सुरु झाली असून सायंकाळी उशिरापर्यंत ती सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, ढासळलेल्या कड्याचा अजूनही काही भाग धोकादायक असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा, असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.