शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्गला मिळाला, केंद्राकडून ४७ कोटी मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:57 IST

मार्चमध्ये प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता

संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाने पर्यटन पाणबुडी खरेदी करण्यासाठी ऑर्डर काढली असल्याची माहिती मिळाली आहे. या पाणबुडीसाठी ४६.९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाला निधी मंजूर केल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून, याच वेळी तिचे राज्य सरकारच्या वतीने मोठ्या दिमाखात लोकार्पण केले जाणार आहे.

सिंधुदुर्गच्या पर्यटन विश्वासाठी चांगली बातमीभारतीय उपखंडात कोठेही नसलेला असा पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देशाचा पर्यटनात एक वेगळाच रुतबा निर्माण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्प हा जागतिक दर्जाच्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. सिंधुदुर्गचे पर्यटन या प्रकल्पामुळे एका वरच्या उंचीवर पोहोचण्यास मदत होणार असल्याचे पर्यटनविश्वातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

असा असणार पाणबुडी प्रकल्पसिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील विश्व जवळून न्याहाळता येणार आहे. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी पाच हजार जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होणार आहे; तर शंभर ते दीडशे कोटींची उलाढाल या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCentral Governmentकेंद्र सरकार