फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’
By Admin | Updated: September 16, 2014 02:38 IST2014-09-16T02:38:36+5:302014-09-16T02:38:36+5:30
फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे.

फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’
पुणो : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे. गेल्या वर्षी खंडवा कारागृहातून पळालेल्या पाच दहशतवाद्यांचा स्फोटाच्या सूत्रधारांत समावेश असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. गुप्तचर यंत्रणांच्या एका वरिष्ठ अधिका:याने त्यास दुजोरा दिला आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे बॉम्ब तयार करीत असताना एका घरामध्ये बॉम्बस्फोट झाला. कुकरचा स्फोट झाल्याचे सांगून हे पाच दहशतवादी निसटण्यात यशस्वी ठरले होते. घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेण्यासाठी पुणो युनिटचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहामधून पळालेल्या सिमीच्या पाच दहशतवाद्यांचा त्यात समावेश असल्याचे तेथील सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे.
महंमद अस्लम अय्यूब, जाकिर हुसेन उर्फ सादिक, महबूब उर्फ गुड्ड, अमजद आणि एजाजुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. बिजनौर येथील बॉम्बस्फोटांमागे सिमीचे दहशतवादी असल्यामुळे त्यांचाच पुण्यातील स्फोटांमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित दहशतवादी वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणो आहे. एटीएसचे प्रमुख हिमांशु रॉय व अन्य वरिष्ठ अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली पुणो एटीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, निरीक्षक सुनील तांबे आदी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
साता:याहून चोरली मोटारसायकल
पळालेल्या पाच दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये 1क् जुलैला फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता एटीएसच्या सूत्रंनी वर्तवली आहे. बॉम्बस्फोट करण्याआधी हे सर्व दहशतवादी खंडव्याहून कोल्हापूरला आले होते. कोल्हापूरला राहत असताना साता:याहून त्यांनी मोटारसायकल चोरली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवला. स्फोट घडविल्यानंतर हे दहशतवादी एसटीने कोल्हापूरला गेल्याचेही सीसीटीव्ही फूटेजमधून निष्पन्न झाले आहे.