सत्तापक्ष नेत्यावर मौन
By Admin | Updated: November 21, 2014 00:53 IST2014-11-21T00:53:40+5:302014-11-21T00:53:40+5:30
महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदावरून भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अजूनही थांबलेली नाही. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके हे महापौर होऊन अडीच महिने झाल्यानंतरही भाजपला नवा सत्तापक्ष नेता

सत्तापक्ष नेत्यावर मौन
कोर कमिटी घेणार निर्णय : महापौरांनी केले स्पष्ट
नागपूर : महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदावरून भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अजूनही थांबलेली नाही. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके हे महापौर होऊन अडीच महिने झाल्यानंतरही भाजपला नवा सत्तापक्ष नेता जाहीर करण्यात यश आलेले नाही. सभागृहात हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला तेव्हा महापौर दटके यांनी आपणच सत्तापक्ष नेताही असल्याचे स्पष्ट केले. नंतर मात्र, पत्रकारांशी बोलताना भाजपची कोर कमिटी याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका सभागृहात सत्तापक्ष नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे संचालन करणाऱ्या महापौरांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत असताना सत्तापक्ष नेता सक्षमपणे बाजू लावून धरतो व विरोधकांच्या चक्रव्यूहातून सत्तापक्षाला बाहेर काढण्याचे काम करतो. मात्र, प्रवीण दटके हे महापौर झाल्यानंतरही भाजपने नवा सत्तापक्ष नेता नेमलेला नाही. सत्तापक्ष नेता म्हणून सभागृहात एकांकी, पोषक, आक्रमक भूमिका घेता येते पण महापौर म्हणून सम्यक दृष्टिकोन ठेवूनच भूमिका मांडावी लागते व निर्णय घ्यावा लागतो. सत्तापक्ष नेते पदाचा अधिभार महापौर दटके यांच्याकडेच असल्यामुळे आजच्या सभेत सत्तापक्ष नेत्याची कमतरता जाणवली. विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी सुनील अग्रवाल, संदीप जोशी यांना पुढाकार घ्यावा लागला. सत्तापक्ष नेत्याचे स्वतंत्र अस्तीत्व सभागृहात दिसले नाही. ही संधी साधत काँग्रेसचे महेंद्र बोरकर व बसपाचे किशोर गजभिये यांनी सत्तापक्ष नेत्याच्या नावाचा खुलासा करण्याची मागणी केली.
विरोध पक्षही शांत
विधानसभा निवडणुकीनंतर होणारी महापालिकेची ही पहिली सभा होती. महापौर प्रवीण दटके यांचीही ही पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेत राजकीय उट्टे काढण्यासाठी व महापौरांची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. विरोधी पक्षातील सदस्यही कमालीचे शांत होते.
विरोध पक्षही शांत
विधानसभा निवडणुकीनंतर होणारी महापालिकेची ही पहिली सभा होती. महापौर प्रवीण दटके यांचीही ही पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेत राजकीय उट्टे काढण्यासाठी व महापौरांची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. विरोधी पक्षातील सदस्यही कमालीचे शांत होते.
नागपूर : महापौर दटके यांनी सध्या आपल्याकडे पदभार असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकला. नंतर पत्रकारांशी बोलताना महापौर दटके म्हणाले, नागपूर विकास आघाडीतर्फे आपले नाव विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तापक्ष नेता म्हणून नोंदविलेले आहे. सध्या हा कार्यभार आपल्याकडेच आहे. स्वतंत्र सत्तापक्ष नेता नसल्यामुळे सभागृह चालू शकत नाही, असा कुठलाही नियम नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.