शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Eye donation: कोरोना काळात नेत्रदानात कमालीची घट, राज्यात ८०० रुग्ण प्रतीक्षा यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:11 IST

Eye donation: कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीत खंड पडला आहे. त्यात याकाळात नेत्र दानात ही सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोना पूर्वीच्या काळात ६६५३ नेत्रदानाची नोंद होती.

मुंबई : कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीत खंड पडला आहे. त्यात याकाळात नेत्र दानात ही सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोना पूर्वीच्या काळात ६६५३ नेत्रदानाची नोंद होती, तर २०२०-२१ दरम्यान केवळ १३५५ नेत्रदानाची नोंद झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागानुसार, एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी या काळात राज्यात २,८६८ नेत्रदानाची नोंद झाली आहे. मात्र कोरोनापूर्वी नेत्रदानाच्या झालेल्या नोंदीपासून हे लक्ष्य दूर आहे. कोरोना काळात संसर्गाच्या दृष्टीने नेत्रदानाला ब्रेक लागला होता. त्यानंतर जून २०२० पासून रुग्णालयात या सेवा सुरू झाल्या, त्यानंतर कासवगतीने यात प्रगती होत आहे. सध्या नेत्रदानासाठी राज्यात ८०० रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता रुग्णालयातील सेवा पूर्ववत होत आहे, त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा आहे, असे आरोग्य संचालनालयाच्या सह संचालिका डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली आहे.

गैरसमज अधिक- दुर्दैवाने देहदान व नेत्रदान विषयी अपेक्षित व्यापक जनजागृती झालेली नाही. जगात सुमारे दहा कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात सुमारे अडीच कोटी अंध आहेत. त्यापैकी ७० % रुग्णांना नेत्र रोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. - कुपोषण, अ जीवनसत्त्वांचा अभाव, डोळ्यांत कचरा, फटाक्यांचा स्फोट अथवा रसायन गेल्याने, तसेच गोवर, कांजिण्या अशा कारणांनी लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्यांची संख्या २५ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे नेत्रदान मोहीम दात्यांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे.

राज्यात २०१९-२० साली३०५८नेत्रदानाची नोंद झाली होती.त्यानंतर २०२०-२१ साली या नेत्रदानात तब्बल ७२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. या कालावधीत केवळ८४७नेत्रदान करण्यात आले. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात १,७३३नेत्रदान करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानMaharashtraमहाराष्ट्र