साताऱ्याच्या भर वस्तीत गुंडाचा गळा चिरुन खून !

By Admin | Updated: April 23, 2016 14:37 IST2016-04-23T14:37:00+5:302016-04-23T14:37:19+5:30

खुनासह वेगवेगळया गुन्ह्यात नाव असलेला गुन्हेगार सुहास लक्ष्मण जानकर उर्फ बोचर याचा साता-यातील राहत्या घराजवळच धारदार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आला

On the side of Satara, the gang of thugs slaughtered! | साताऱ्याच्या भर वस्तीत गुंडाचा गळा चिरुन खून !

साताऱ्याच्या भर वस्तीत गुंडाचा गळा चिरुन खून !

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २३ -  खुनासह वेगवेगळया गुन्ह्यात नाव असलेला गुन्हेगार सुहास लक्ष्मण जानकर उर्फ बोचर याचा साता-यातील राहत्या घराजवळच धारदार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आला. 
 शहराच्या भरवस्तीत ही घटना घडल्याने मंगळवार पेठेत तणाव निर्माण झाला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, यावेळी घटनास्थळालगतच घरगुती कार्यक्रम चालू होता. 
 शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय आहिवळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, समर्थ मंदिरापर्यंत श्वानाने माग काढला. मृतदेहालगत धारदार शस्त्र पडले होते, तसेच बोचरला विटांनीही मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिस तपास सुरु आहे.|ऑ

 

Web Title: On the side of Satara, the gang of thugs slaughtered!