मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

By Admin | Updated: October 20, 2016 16:06 IST2016-10-20T13:18:45+5:302016-10-20T16:06:13+5:30

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा गुंडांचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.

The side of MNS goons - Babul Supriyo | मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20 - 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा गुंडांचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.  दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत सिनेमाला विरोध दर्शवला आहे. तसेच 'मल्टिप्लेक्स मालकांनी हा सिनेमा दाखवू नये,  अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ', अशी धमकीदेखील दिली आहे.
 
यावरच प्रतिक्रिया देताना सुप्रियो यांनी म्हटले आहे की, 'मनसेला थिएटरर्समध्ये कुठल्याही प्रकारे उद्धटपणा करण्याचा किंवा गोंधळ घालण्याचा अधिकार नाही. तसेच मनसे हा गुंडांचा पक्ष आहे', असे म्हणत मनसेने स्वीकारलेल्या भूमिकेला सुप्रियो यांनी विरोध दर्शवला आहे. 
 
केंद्र सरकारकडून 100 टक्के पाठिंब्याचं आश्वासन 
दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.  'राजनाथ सिंह यांनी 100 टक्के पाठिंबा दशर्वला असून, ते राज्यातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी संपर्क साधणार आहेत. शिवाय 'ए दिल है मुश्किल' सिनेमा कुठल्याही समस्येशिवाय प्रदर्शित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे', असे मुकेश भट्ट यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: The side of MNS goons - Babul Supriyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.