सिद्धिविनायकाचरणी आता शेअर्स
By Admin | Updated: July 20, 2016 02:19 IST2016-07-20T02:19:30+5:302016-07-20T02:19:30+5:30
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पांच्य चरणी आता शेअर्सही अर्पण करता येणार आहेत.

सिद्धिविनायकाचरणी आता शेअर्स
मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पांच्य चरणी आता शेअर्सही अर्पण करता येणार आहेत. यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी डिमॅट खाते उघडले आहे.
सिद्धिविनायक मंदिराने यासाठी एसबीआयसीएपीची मदत घेतली आहे. मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र मुरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शेअरच्या माध्यमातून देणगी देता यावी, म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे. या शेअर्सचा उपयोग विविध सामाजिक कार्यांसाठी केला जाणार आहे. याचा पहिला टप्पा यशस्वी होताच म्युच्युअल फंड्स, बाँड, तसेच गोल्ड बाँड्सही स्वीकारण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
भाविकांनी शेअर दान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याची विक्री केली जाईल. मंदिराकडील ४४ किलो सोने शासनाच्या गोल्ड बाँड्स स्किममध्ये आहे. मंदिराला दरवर्षी ७५ कोटींची देणगी येते. (प्रतिनिधी)