आव्हाडांना घेरण्याच्या नादात शिवसेनेत सुंदोपसुंदी

By Admin | Updated: September 15, 2014 22:44 IST2014-09-15T22:44:21+5:302014-09-15T22:44:21+5:30

चारीमुंडय़ा चित करण्याचा डाव आखलेल्या शिवसेनेसमोर आता त्यांच्याच पक्षातील इच्छुकांना थोपविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Siddhasatsundi in the Shiv Sena, in the absence of encroachment | आव्हाडांना घेरण्याच्या नादात शिवसेनेत सुंदोपसुंदी

आव्हाडांना घेरण्याच्या नादात शिवसेनेत सुंदोपसुंदी

ठाणो : कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात व्यूहरचना आखून त्यांच्या घरातच त्यांना चारीमुंडय़ा चित करण्याचा डाव आखलेल्या शिवसेनेसमोर आता त्यांच्याच पक्षातील इच्छुकांना थोपविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेमध्ये अनेक इच्छुकांनी यासाठी मोर्चेबांधणी केली असून काहींनी तर तिकीट निश्चित होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळसुद्धा फोडला आहे. त्यामुळे आव्हाडांना घेरण्याचा प्लॅन आता शिवसेनेच्याच अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
2क्क्9 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना 65,51क् मते मिळाली होती, तर शिवसेनेचे राजन किणो यांना 45,821 मते मिळाली होती. मनसेच्या प्रशांत पवार यांना 15 हजार 119 मते मिळाली होती.  समाजवादी पक्षाचे सुरमे यांनी 3,429 तर बसपाच्या सचिन म्हात्रे यांनी 2,756 मते घेतली होती. 
परंतु, आता आव्हाडांना त्यांच्याच घरात हेरण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासंदर्भात मागील महिन्यात एक सर्वपक्षीय बैठकही झाली होती. तिला शिवसेना, काँग्रेस, समाजवादी आदी पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. समाजवादीतर्फे या ठिकाणी उमेदवार दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तसेच आता अकबरुद्दीन ओवेसी गटानेसुद्धा येथे आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या वेळेस एमआयएमचा कार्यकर्ता शिवसेनेच्या मदतीनेच कार्यक्रमस्थळी आल्याचे उघड झाले आहे. 
ओवेसीच्या वतीने रौफ लाला  येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चिन्ह आहे. अश्रफ मुलाणी यांनीदेखील एमआयएममध्ये प्रवेश केल्याने आव्हाडांना येथे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, आता शिवसेनेने आखलेल्या या व्यूहरचनेत आता त्यांचाच पाय अडकण्याची चिन्हे आहेत. 
आव्हाडांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले दशरथ पाटील यांचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. ते नगरसेवक म्हणून एकदाच निवडून आले आहेत. परंतु, नंतरच्या काळात झालेल्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. याशिवाय, मफतलाल कंपनीच्या आंदोलनाच्या पलीकडे त्यांचा फारसा प्रभाव येथे जाणवत नाही. दुसरीकडे मुंब्य्रातील सुधीर भगत यांनाही येथे निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागले आहेत. वडिलांच्या पुण्याईचे वजन आजही येथे असल्याने त्या शिदोरीवर त्यांनी येथे आपला दावाकेला आहे. (प्रतिनिधी)
 
आता आव्हाडांना त्यांच्याच घरात हेरण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासंदर्भात मागील महिन्यात एक सर्वपक्षीय बैठकही झाली होती. तिला शिवसेना, काँग्रेस, समाजवादी आदी पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. समाजवादीतर्फे या ठिकाणी उमेदवार दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तसेच आता अकबरुद्दीन ओवेसी गटानेसुद्धा येथे आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. 

 

Web Title: Siddhasatsundi in the Shiv Sena, in the absence of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.