शुभा राऊळ यांची शिवसेनेत घरवापसी, मनसेला केला रामराम
By Admin | Updated: January 7, 2015 13:25 IST2015-01-07T13:20:24+5:302015-01-07T13:25:13+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून मनसेत गेलेल्या मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बुधवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शुभा राऊळ यांची शिवसेनेत घरवापसी, मनसेला केला रामराम
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून मनसेत गेलेल्या मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बुधवारी पुन्हा 'घर वापसी' करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षनेतृत्वाशी मतभेद नव्हते, वेगळ्या कारणांमुळे शिवसेना सोडली होती, पण आता उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत डॉ. शुभा राऊळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्याशी राऊळ यांचे मतभेद असल्याने त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून मनसेत झेंडा हाती घेतला. दहीसर मतदारसंघातून त्यांनी घोसाळकर यांच्याविरोधात मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र राऊळ यांचा पराभव झाला होता. आता शुभा राऊळ यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.