शुभा राऊळ यांची पालिका निवडणुकीतून माघार

By Admin | Updated: February 2, 2017 10:59 IST2017-02-02T10:59:27+5:302017-02-02T10:59:27+5:30

माजी महापौर शुभा राऊळ यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी. यासाठी आपण

Shubha Raul retires from municipal elections | शुभा राऊळ यांची पालिका निवडणुकीतून माघार

शुभा राऊळ यांची पालिका निवडणुकीतून माघार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - माजी महापौर शुभा राऊळ यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी. यासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे  शुभा राऊळ यांनी सांगितले. दरम्यान, आता राऊळ यांच्या प्रभाग क्र. 8 मधून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र शुभा राऊळ ह्या दीपा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत.  
निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊळ म्हणाल्या, "मी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वीच घेतला होता. मी याआधी महापौर पदही भूषवले आहे. त्यामुळे आता इतर कार्यकर्त्यांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणून  निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. आता प्रभाग क्र. 8 मधून उमेदवारीचा निर्णय  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील."

Web Title: Shubha Raul retires from municipal elections