श्रीवर्धनमध्ये वाळीत प्रकरणी १९ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: May 8, 2015 04:18 IST2015-05-08T04:18:59+5:302015-05-08T04:18:59+5:30
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात पती हरवल्याप्रकरणी येथील सतीचीवाडी-वडघर या गावातील रसिका मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती.

श्रीवर्धनमध्ये वाळीत प्रकरणी १९ जणांवर गुन्हा
अलिबाग : श्रीवर्धन पोलीस ठाण्यात पती हरवल्याप्रकरणी येथील सतीचीवाडी-वडघर या गावातील रसिका मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी गावकीने सातत्याने दबाव आणून धमक्या दिल्याने रसिका यांनी बुधवारी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वडघर गावकीच्या १९ जणांविरुद्ध श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वडघरच्या १९ सदस्यांमध्ये गावकीप्रमुख प्रकाश जाधव, यशवंत जाधव, संतोष मोकल, नामदेव जाधव, दिलीप जाधव, सागर जाधव, संतोष पाटील, प्रकाश जाधव, गणेश पाटील, महादेव जाधव, राजाराम जाधव, रमेश जाधव, जितू मांडवकर, लक्ष्मी मोकल, कविता जाधव, रजनी जाधव, संगीता शेडगे, राजेश्री जाधव आणि मीनाक्षी भोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.