शेगावात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

By Admin | Updated: April 4, 2017 15:19 IST2017-04-04T15:09:33+5:302017-04-04T15:19:30+5:30

हजारो भाविकांच्या उपस्थिती; दुपारी श्रीराम जन्म सोहळा उत्साहात.

Shriram Janmotsav celebrations in Shiga | शेगावात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

शेगावात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

शेगाव : संत श्री गजानन महाराज संस्थानमध्ये होणा-या श्रीराम जन्मोत्सवासाठी शेगावात भाविकांची मांदियाळी जमली असून हजाराचे वर भजनी दिंड्या या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. मंगळवारी श्रीरामनवमी दिनी सकाळी १० वा. यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान झाले त्यानंतर दुपारी १२ वा. श्रीराम जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन हभप विष्णुबुवा कव्हळेकर करणार आहे. तद्नंतर १२ वा. श्रीराम मंदीरासमोर आकर्षक सजावट केलेल्या चांदीच्या पाळण्यात श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपारिक पध्दतीने साजरा झाला. दु.२ वा. कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजतमुखवट्याचे पुजन झाल्यानंतर रथ, मेणा व गज अश्वासह टाळकरी व पताकाधारी यांच्यासह शिस्तीत नित्यनेमाने पालखी नगर परिक्रमेसाठी प्रस्थान केले.

Web Title: Shriram Janmotsav celebrations in Shiga