शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 11:15 IST

श्रीपाद छिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर-  शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला पोलिसांनी शुक्रावारी संध्याकाळी अटक केली होती. जिल्ह्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळी श्रीपाद छिंदमला न्यायालयात हजर केलं. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शनिवारी सकाळीच न्यायालयीन कामकाज आटोपून  सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. शनिवारी न्यायालय आवारात होणारी गर्दी लक्षात घेऊन सकाळी 8 वाजताच न्यायालयीन कामकाज आटोपण्यात आले. छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली होती. छिंदम याला 1मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?शुक्रवारी सकाळी छिंदमने मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी काल माणसे का पाठविली नाहीत, याची विचारणा केली होती. शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो, असे बिडवे म्हणाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज व शिवजय़ंतीबाबत छिंदम यांनी अपशब्द वापरले.बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. महापालिकेतील उपमहापौर छिंदम यांचे कार्यालय फोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन छेडलं आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसCourtन्यायालय