श्रीकृष्ण झेलतो आसुडाचे फटके.. 150 वर्षाची प्राचिन पंरपरा

By Admin | Updated: August 25, 2016 21:31 IST2016-08-25T20:30:53+5:302016-08-25T21:31:36+5:30

श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुस:या दिवशीचा गोपाल काला व श्रीकृष्ण पालखीची तब्बल 150 वर्षाची प्राचिन परंपरा आहे.

Shrikrishna is caught by the stroke of 150 years | श्रीकृष्ण झेलतो आसुडाचे फटके.. 150 वर्षाची प्राचिन पंरपरा

श्रीकृष्ण झेलतो आसुडाचे फटके.. 150 वर्षाची प्राचिन पंरपरा

जयंत धुळप

अलिबाग, दि.25 - अलिबाग शहरात मेटपाडा, पुजारी,मांडवकर, भोसले, चंढेरे असे श्रीकृष्णाचे पारंपरिक मठ असून या मंठांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुस:या दिवशीचा गोपाल काला व श्रीकृष्ण पालखीची तब्बल 150 वर्षाची प्राचिन परंपरा आहे. या श्री कृष्ण मठांमध्ये मेटपाडा गोविंद मठातून निघालेली श्रीकृष्ण पालखी पोहोचताच, तेथील आदल्या दिवशी पासून श्रीकृष्णाचा उपास केलेल्या गोविंदांच्या अंगात चक्क श्रीकृष्ण संचारतो आणि या अंगात श्रीकृष्ण आलेल्या गोविंदाना आसुडाचे फटके देण्यात येतात, परंतू हे फटके थेट श्रीकृष्णच झेलत असल्याने गोविंदाला फटके बसत नाहित अशी गेल्या अनेक वर्षाची श्रद्धा आजही अबाधीत आहे.

पालखी आणि उपास केलेल्या सर्व गोविंदाची पूजा गुरुवारी मेटपाडा गोविंद मठातून श्रीकृष्णाची पालखी पारंपरिक टाळमृदूंगाच्या भजनांच्या साथीने निघालेली आणि शहरातील विविध मंदिरांसमोर आरती करीत दुपारी तिन वाजता पूजारी यांच्या मठात पोहोचली. तेथे सुहासिनींनी पालखी आणि उपास केलेल्या सर्व गोविंदाची पूजा करुन त्यांना औक्षण केल्यावर या सर्व गोविंदाच्या डोक्यावर आसुडाने दहिहंडय़ा फोडून त्यांना न्हाऊ घालण्यात आले. त्यानंतर सात गोविंदाच्या अंगात परंपरेनुसार श्रीकृष्ण अंगात आल्यावर त्यांना आसूडाचे फटके देण्यात आले.

श्रीकृष्ण अंगात संचारल्यावर आम्हीला त्यास थेट भेटल्याचीच अनूभूती येते अशी अत्यंत श्रद्धेय प्रतिक्रीया अंगात आलेल्या गोविंदानी नंतर दिली आहे. आजच्या आधूनिक काळातही अलिबागच्या या पारंपरिक श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे औत्सूक्य तरुणाईमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येते, त्यांतूनच श्रीकृष्ण पालखीत गुरुवारी तरुण मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसू येत होते.

 

Web Title: Shrikrishna is caught by the stroke of 150 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.