शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Shrikant Shinde Sanjay Raut: "संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:31 IST

श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला होता

Shrikant Shinde Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांनी याबाबतचं पत्रक ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होते. राऊतांनी लिहिलेल्या पत्रात थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या मुद्द्यावर आज श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "संजय राऊतांची मला खूप काळजी वाटते. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे. संजय राऊत यांची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे सकाळचे मनोरंजन होणार नाही," अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली. अंबरनाथच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर खळबळ उडाली. यावर गेल्या दोन दिवसात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज अंबरनाथमध्ये त्यांनी यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टोलेबाजी केली.

"संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल. त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंदरकर सांगतात की, मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते. मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते", असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. "संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला, असे लक्षण दिसत आहे. त्यात रुग्णाला भास होतात. मला कुणीतरी आवाज देतो, असे वाटते," असे सांगत श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना टोला लगावला. राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत राऊतांमुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShrikant Shindeश्रीकांत शिंदे