शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:05 IST

Shrikant Shinde Income Tax Notice: खा. श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते.

Shrikant Shinde Income Tax Notice: मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अधिवेशन सोडून काल अचानक दिल्लीत गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती माध्यमांनाही नव्हती. आज सकाळी याबाबतची माहिती समोर आली. अशातच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) आयकर विभागाची नोटीस मिळाल्याचे वक्तव्य केल्याने मोठा गोंधळ उडाला. 

या वृत्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, पुन्हा संजय शिरसाटांनी माध्यमांसमोर येऊन आपले वक्तव्य मागे घेतले. आपल्या तोंडी हे वाक्य घातल्याचे स्पष्टीकरण शिरसाटांनी दिले. संजय शिरसाट म्हणाले की, मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. काही पत्रकारांनी विचारले श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस आली आहे का? तर मी म्हटले त्यांना नोटीस आली असेल, तर त्याबाबत मला माहीत नाही. श्रीकांत शिंदेंना नोटीस आली की नाही, हे मला माहित नाही, हे वाक्य माझ्या तोंडी घातले, असे स्पष्टीकरण शिरसाटांनी दिले.

संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीससंजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर कार्यक्रमात आपल्याला आयकर खात्याची नोटीस आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील विटस् हॉटेल लिलावात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. यात शिरसाटंचा मुलगा गुंतल्याचा आरोपही झाला. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली.

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विट्स प्रकरणी तक्रार केल्यानंतरच आयकर खात्याचे लक्ष शिरसाट यांच्याकडे वळल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्याकडील संपत्ती, आर्थिक व्यवहार आणि करदायित्व यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मंत्री शिरसाट यांनी नोटीस मिळाल्याची कबुली दिल्यानंतर माजी खासदार जलील यांनी या प्रकरणात सत्य समोर आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाIncome Taxइन्कम टॅक्स