शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

आई बापानं जमीन विकून शिकवलं; पोरानं यूपीएससी पास होत घरच्यांचं नाव काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:50 IST

यूपीएससी परीक्षेत श्रीकांत खांडेकरचं नेत्रदीपक यश

सोलापूर: घरची बेताची परिस्थिती, शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न, त्यामुळे वडिलांना करावी लागणारी मजुरी अशा परिस्थितीचा सामना करत श्रीकांत खांडेकरनं केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत डोळे दिपवून टाकणारं यश मिळवलं. भारतीय वनसेवा परीक्षेत श्रीकांत 33 वा आला. श्रीकांतसह त्याच्या दोन भावांसाठी वडील कुंडलिक काबाडकष्ट केले. त्याचं श्रीकांतनं चीज केलं. मंगळवेढा या दुष्काळी तालुत्यातल्या बावची गावात राहणारे कुंडलिक खांडेकर स्वत: अशिक्षित आहेत. मात्र त्यांना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन एकर जमीन विकली. वडिलांच्या या कष्टाची श्रीकांतनं कायम जाण ठेवली. जिरायती जमीनतून फारसं उत्पन्न येत नसल्यानं कुंडलिक यांनी मजुरी केली. मात्र मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. श्रीकांतचं सुरुवातीचं शिक्षण बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून त्यानं बारावी पूर्ण केली. दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू असतानाच श्रीकांतची आयआयटीत निवड झाली. मात्र तरीही तिकडे न वळता लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं यावर तो ठाम होता. श्रीकांतनं एक वर्ष पुण्यात राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. त्यानंतर सहा महिने नवी दिल्लीत मुक्काम करुन जोरदार अभ्यास केला. परीक्षेच्या निकालात त्याची ही मेहनत अगदी स्पष्टपणे दिसून आली. पहिल्याच प्रयत्नात श्रीकांत देशात 33 वा आला, तर राज्यात ओबीसी प्रवर्गात दुसरा आला. मुलाच्या या यशानं कुटुंब सुखी झाल्याची बोलकी प्रतिक्रिया कुंडलिक यांनी दिली. आम्ही आजही रोजगारानं कामाला जातो. शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचं व्याज भरणं सुरू आहे. मुलांसाठी कष्ट घेतले. त्यांनी त्याची जाण ठेवून ते सार्थकी लावले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुरुवातीला इंग्रजीमुळे थोडा संघर्ष करावा लागल्याचं श्रीकांतनं सांगितलं. मात्र परिस्थितीची कायम जाणीव ठेवली. आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळवता आलं, असं श्रीकांतनं म्हटलं. शहरी मुलांशी स्वत:ची तुलना न करता ध्येय समोर ठेवून अविरत मेहनत केल्यास यश मिळतं, असा कानमंत्रही त्यानं दिला.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगSolapurसोलापूरexamपरीक्षा