श्रीगोंद्यातील विद्यार्थी सहलीच्या बसला अपघात, तीन ठार २२ जखमी
By Admin | Updated: February 14, 2016 11:56 IST2016-02-14T11:49:43+5:302016-02-14T11:56:02+5:30
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी तळबीडजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि अन उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली.

श्रीगोंद्यातील विद्यार्थी सहलीच्या बसला अपघात, तीन ठार २२ जखमी
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. १४ - पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी तळबीडजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. २२ जण जखमी झाले असून, त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची ही बस होती. सहलीवरुन गोव्याहून परतत असताना हा भीषण अपघात झाला.
दौंडचा अभिजीत पंडीत पेठकर हा विद्यार्थी, श्रीगोंद्यातील पेडगावचा सुर्यकांत सुदाम कानडे हा शिपाई आणि पिंपरीचे प्रकाश बसवराज बिराजदार क्लिनर या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.