‘श्रीं’चे आगमन खड्डय़ातूनच?
By Admin | Updated: August 22, 2014 00:35 IST2014-08-22T00:35:38+5:302014-08-22T00:35:38+5:30
शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत पालिका प्रशासनाने अद्याप एक अवाक्षरही काढलेले नाही.

‘श्रीं’चे आगमन खड्डय़ातूनच?
मुंबई : अवघ्या मुंबापुरीला गणोशोत्सवाचे वेध लागले असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील श्रीगणोशाच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी यासंदर्भातील 26 ऑगस्ट ही डेडलाइन पाळली जाईल की नाही, याबाबतच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
मुंबईकरांच्या टीकेला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणा:या निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे पावसाळ्यात पुन्हा बुजविण्यात आलेले खड्डे उखडत होते. जून आणि जुलै महिना महापालिका प्रशासनाने खड्डय़ांबाबत कसाबसा मारत नेला असला तरी या वेळी मात्र महापालिकेची दुहेरी कोंडी झाली आहे.
मुंबईत गणोशोत्सवाचे पडघम वाजू लागल्यानंतर सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. यापूर्वीच महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन आणि विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत समितीने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय अशा सर्वच खड्डय़ांची माहिती महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान महापौर सुनील प्रभू यांनी गणोशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली होती. शिवाय गणोशोत्सवात भक्तांना आणि सर्व मुंबईकरांना खड्डय़ांचा त्रस होणार नाही, याकरिता महापालिका निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी बैठकीदरम्यान नमूद केले होते.
प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. कारण शहर आणि उपनगरातील श्रींच्या आगमन-विसजर्न मार्गावरील खड्डय़ांबाबत पालिका प्रशासनाने अद्याप एक अवाक्षरही काढलेले नाही.
सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीची डेडलाइन 26 ऑगस्ट देण्यात आली होती. विशेषत: श्री गणोशाच्या आगमन आणि विसजर्न मार्गावरील खड्डे लवकर बुजविण्यात यावे, असे म्हणणो आम्ही गतबैठकीदरम्यान मांडले होते. पालिकाही याबाबत सकारात्मक आहे. विशेषत: वॉर्ड स्तरावरही आयुक्तांसोबत समितीच्या पदाधिका:यांच्या बैठका होत असून, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी)
च्कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलावाकडे जाण्यासाठी मगन नथुराम मार्ग आहे आणि या मार्गाहून श्रीगणोशाचे आगमनही होते. शिवाय विसजर्नही होते. गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर मोजता येणार नाहीत एवढे खड्डे पडले आहेत. विशेषत: या मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, काही ठिकाणी मार्गाचा काही भाग सखल झाला आहे.
च्पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर तलावालगतच्या विसजर्न मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले होते. यावर उपाय म्हणून या रस्त्यांवरील खड्डय़ांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परंतु आता पुन्हा त्यातील खडी बाहेर पडल्याचे स्थानिकांच्या वतीने सांगण्यात आले.
पूर्व उपनगरातील भांडुप येथील शिवाजी तलावालगतच्या विसजर्न मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यातील काही खड्डय़ांची दुरुस्ती पालिकेने सुरू केली आहे. मात्र उर्वरित खड्डे कधी बुजणार, असा सवालही स्थानिकांकडून केला जात आहे.