शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:59 IST

आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.

नागपूर: महाराष्ट्रातील तरुणी श्रद्धा वालकर हिची दिल्लीत आफताब पुनावाला नावाच्या तरुणाने निर्घृण हत्या केली. त्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी (Shraddha Walkar) विशेष पथक नेमून चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. तसेच, आरोपी आफताबला फाशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार(Ajit Pawar) यांनी केली. 

श्रद्धा वालकर प्रकरणाचा सामाजिक परिणाम लक्षात घेऊन, अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणले. तसेच, विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा शेलार यांनी केली आणि ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

70 तुकडे केले तर समाधान वाटेल-अजित पवार श्रद्धा वालकर प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आपल्याकडे असा काही कायदा असता की, त्या आफताबने श्रद्धाचे जसे 35 तुकडे केले, तसे त्याचे 70 तुकडे केले, तर सगळ्यांना समाधान वाटेल. श्रद्धा प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे आणि दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लावावा. त्या आरोपीला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण नेणार- देवेंद्र फडणवीसयावर बोलातना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण नेणार आहे. या प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल. श्रद्धाने आफताबची तक्रार केली होती मात्र परत का घेतली, याची चौकशीही होईल. यासोबतच तिने तक्रार करण्यात आणि ती परत घेण्यात एका महिन्याचा कालावधी गेला. या एका महिन्यात पोलिसांनी काय कारवाई केली? या सर्वांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली. आपली मुलगी होती म्हणून गृहमंत्र्यांना विनंती करू लवकरात लवकर फाशी व्हावी, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर