शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा हत्याकांड: दोन वर्षांपासून आफताब श्रद्धाला करत होता मारहाण; मित्र-मैत्रिणींनी केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 08:40 IST

मागील दोन वर्षांपासून श्रद्धाला आफताब मारहाण करत होता, तर ती त्याच्यासोबत का राहत होती, हा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

नालासोपारा : वसईच्या श्रद्धा वालकर (२७) हिची तिचा प्रियकर आफताब याने दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला उघड झाली होती. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डिसेंबर २०२० पासून श्रद्धाला आफताब मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, असा दावा तिच्या मित्र-मैत्रिणींनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून श्रद्धाला आफताब मारहाण करत होता, तर ती त्याच्यासोबत का राहत होती, हा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्याची मारझोड तसेच होणारा त्रास, छळ ती का व कोणत्या कारणाने सहन करत होती, असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. 

तिच्या मित्र-मैत्रिणींनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर अनेक दावे केले आहेत. त्यापैकी डिसेंबर २०२० मध्ये आफताबने एव्हरशाईन येथे राहत असताना तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला तुळींज पोलिस ठाण्यात मित्र घेऊन गेला होता. तुळींज पोलिसांनी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण तिने याकडे कानाडोळा केला व मेडिकल करण्यासाठी ती गेलीच नाही. तेव्हा ती मेडिकल करण्यासाठी का गेली नाही? कोणत्या कारणामुळे तिने माघार घेतली?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

...तर श्रद्धा जिवंत असती-    श्रद्धाने मेडिकल व गुन्हा दाखल केला असता तर आज कदाचित श्रद्धा जिवंत असती, असे तिचा मित्र राहुल राय याने सांगितले.-    आफताबने श्रद्धाला अनेक वेळा मारहाण केली होती, असे तिच्या मित्र-मैत्रिणींकडून आता सांगितले जात आहे. पोलिसही श्रद्धा आणि आफताब या दोघांच्याही मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबीयांचे जबाब नोंदवत आहेत.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईVasai Virarवसई विरारPoliceपोलिस