शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाने पालकांपासून लपविला घरचा पत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:44 IST

आफताबच्या कुटुंबीयांनी वसईतील घर सोडून ते अन्यत्र राहायला गेले आहेत. ते नेमके कुठे गेले आहेत, याची माहिती तेथील रहिवाशांना नाही.

वसई : श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिने लग्नास होकार दिला होता. मात्र, दुःखात असल्याने वडिलांनी काही काळ थांबण्यास सांगितले होते. कदाचित याचा तिला राग आला असावा, त्यामुळे तिने घरचा पत्ताही कुटुंबीयांना सांगितला नव्हता, असे आता उघड झाले आहे.  काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केलेल्या आपल्या मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध वागणे श्रद्धाच्या आई- वडिलांना आवडले नव्हते. मात्र, आपण आता २५ वर्षांची झाल्यामुळे मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे सांगत तिने घर सोडले होते. दरम्यान, आफताबच्या प्रेमात वेडी होऊन घर सोडलेल्या श्रद्धाला आफताब मारहाण करीत असे, हे श्रद्धाने कधीच सांगितले नसल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र, ती आफताबच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि आफताब तिला मारहाण करायचा असे तिच्या मित्रांकडून त्यांना समजले होते. मात्र, तिने ही बाब कुटुंबीयांना कळवली नाही तसेच परत येण्याबाबत निर्णयही घेऊ शकली नाही, असे ते म्हणाले.

शेजारचे अनभिज्ञआफताबच्या कुटुंबीयांनी वसईतील घर सोडून ते अन्यत्र राहायला गेले आहेत. ते नेमके कुठे गेले आहेत, याची माहिती तेथील रहिवाशांना नाही. त्यांचा लहान मुलगा असद याला मुंबईला नोकरी लागल्याने ते मुंबईला गेले आहेत. रेल्वेने गर्दीतून ये- जा करताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस