शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

श्रद्धा,आफताब अमली पदार्थांच्या आहारी होते, वसईत दिल्ली पोलिसांनी केली चौघांची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 10:11 IST

आफताफचे आई-वडील गेली अठरा वर्ष वसईत राहत होते. मात्र अचानक दिवाळीच्या आधी त्यांनी घर खाली केले.

नालासोपारा : वसईतील श्रद्धा वालकर हिच्या हत्या प्रकरणाने मुंबईसह दिल्लीतही खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक वसई दाखल झाले आहे.  शुक्रवारपासून दिल्ली पोलिसांनी सहा जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. शनिवारी नव्याने श्रद्धाचा मित्र गॉडविन राॅड्रीग्ज, राहुल राय, मालाड येथील कॉल सेंटरचा मॅनेजर करण बहरी आणि श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे या चौघांचे जबाब नोंदवले आहेत. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी डॉक्टर शिंदे आणि श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर या दोघांचे जबाब नोंदवले. मात्र शनिवारी जबाबदातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धा आणि आफताब या दोघांनादेखील ड्रग्सचे व्यसन होते, अशी माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.आफताफने गांजाचे सेवन करून श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर दहा तास तिचे ३५ तुकडे केले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना त्याने दिली आहे. तसेच शनिवारी गॉडविनने दिलेल्या जबाबातदेखील श्रद्धा ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली आहे. या तपासाचा महत्त्वाचा भाग असलेले आफताबचे आई-वडील अद्याप कुठे आहेत याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नसून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आफताबच्या आई-वडिलांना कृत्याची माहिती? -आफताफचे आई-वडील गेली अठरा वर्ष वसईत राहत होते. मात्र अचानक दिवाळीच्या आधी त्यांनी घर खाली केले. त्यामुळे आफताबच्या आई-वडिलांना आफताबने केलेल्या क्रूर कृत्याची माहिती असावी, असा संशय पोलिस वर्तवत आहेत. आता पोलिस श्रद्धा ड्रग्स कोणाला विकत होती आणि कोणाकडून खरेदी करत होती याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे मित्र-मैत्रिणींची दिल्ली पोलीस अधिकाधिक तपास करून माहिती जाणून घेत आहेत.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस