ट्विटरवर सहानुभूतीचा पाऊस
By Admin | Updated: May 7, 2015 02:37 IST2015-05-06T23:42:58+5:302015-05-07T02:37:42+5:30
सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होताच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सलमान खानला पाठिंबा दर्शवला.

ट्विटरवर सहानुभूतीचा पाऊस
मुंबई, दि. ७ - सलमानच्या निकालाबाबत सकाळपासूनच टि¦ट्सचा अक्षरश: पाऊस पडला. बहुतांशी कलाकार शिक्षेबद्दल दु:ख व्यक्त करत होते.
सानिया मिर्झा - आता बोलण्यासारखे दुसरे काही नाही. सलमान तू कायम खंबीर राहतोस, तसाच राहा.
हेमामालिनी - सलमानविषयी मला सहानभूती आहे. मी प्रार्थना करते की, त्याला जास्त शिक्षा होऊ नये
वरुण धवन - सलमान खूप मोठा माणूस आहे. सिनेसृष्टीत सर्वांना मदत करणारी व्यक्ती म्हणून सलमानची ओळख आहे
सोनाक्षी सिन्हा - धक्कादायक बातमी आहे. काय बोलायचे मला कळत नाहीये पण मी कोणत्याही परिस्थीतीत सलमानच्या पाठिशी आहे. तो एक चांगला माणूस आहे आणि त्याचा चांगूलपणा कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
मनोज तिवारी - न्यायालयाचा निर्णय स्विकारायलाच हवा. पण मी सलमानसाठी प्रार्थना करणार आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये नेहमीच प्रत्येकाला मदत करण्यासाठी सलमान पुढाकार घेतो. याचाही न्यायालयाने विचार करावा.
चिरंजीवी - अजूनही वरच्या न्यायालयात सलमान अपील करू शकतो. त्यासाठी सर्वांनी मिळून सलमानसाठी प्रार्थना करायला हवी.
बाबूल सुप्रिया - सलमानच्या बाबतीत हे घडेल, असे वाटले नव्हते. त्याचे वाईट वाटते. सलमानसोबत मी दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे न्यायालयाने सलमानचे सामाजिक कार्य आणि बदललेली वागणूक लक्षात घेऊन कमी शिक्षा द्यावी, असे वाटते.
आलिया भट - आपल्या माणसाला या परिस्थितीत पाहणे कठीण आहे. हे वेदनादायक आहे. सलमान आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत.
बिपाशा बासू - सलमानने कायम समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक भान असणार्या या अभिनेत्याबाबत योग्य निर्णय अपेक्षित आहे.
दिया मिर्झा - सलमानच्या खटल्याबाबत माझे काही म्हणणे नाही. पण त्याच्याशी माझे भावनिक नाते आहे. त्याने माझ्या आईचे आयुष्य वाचविले आहे.
रितेश देशमुख - न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणणे नाही. मात्र सलमानबद्दल मला नितांत प्रेम आहे, तो मला भेटलेला दिलदार माणूस आहे
मिका सिंग - जो सर्वांसाठी उभा असतो, त्याच्यासाठी मी उभा राहणारच. सलमान तुझा नेहमीच आदर वाटतो. मी आणि तुझे सर्व चाहते तुझ्यासोबत आहोत
शोभा डे - आता ही खरी वेळ आहे योग्य माणूस बनण्याची!
हा अतिशय कठीण काळ आहे. संपूर्ण कपूर कुटुंबिय सलीम खान यांच्यासोबत आहे.
- ऋषी कपूर, अभिनेता
फराह खान - मी दुबईमध्ये आहे. पण सलमान आणि त्याच्या परिवारासाठी प्रार्थना कायम सुरु आहेत.