तमाशा फडाच्या स्पर्धा रंगणार

By Admin | Updated: May 28, 2016 01:30 IST2016-05-28T01:30:15+5:302016-05-28T01:30:15+5:30

तमाशा कलावंतांकडून होणाऱ्या तमाशा महोत्सवाच्या मागणीवर विचार करून राज्य सांस्कृतिक विभागामार्फत तमाशा फंडाची स्पर्धा राज्यात आयोजित केली जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक

The show will be played in the competition | तमाशा फडाच्या स्पर्धा रंगणार

तमाशा फडाच्या स्पर्धा रंगणार

मुंबई : तमाशा कलावंतांकडून होणाऱ्या तमाशा महोत्सवाच्या मागणीवर विचार करून राज्य सांस्कृतिक विभागामार्फत तमाशा फंडाची स्पर्धा राज्यात आयोजित केली जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले. रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना अनुदान वितरण कार्यक्रमात तावडे बोलत होते. अनुदानप्राप्त तब्बल ३६ संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या तावडे यांच्यासमोर मांडल्या. शासनाकडून राज्यभरात होणारे तमाशा महोत्सव मुंबई वगळता अन्य ठिकाणी बंद करण्यात आल्यामुळे तमाशा कलाकाराला स्पर्धेत उतरता येत नसल्याची खंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.

Web Title: The show will be played in the competition