शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षे घराबाहेर न पडलेला मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:14 IST

Eknath Shinde: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवला, असा टोमणा मला मारला. आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी टीका एकनाथ शिंदे 

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की,  शेतकऱ्यांची सुद्धा हेलिकॉप्टरने फिरले पाहिजे. तालुक्या तालुक्यामध्ये हेलिपॅड करायचे आहे. त्याचं कारण म्हणजे कुणाला कधी आरोग्याचा प्रश्न झाला. तर त्याला एअर अॅम्ब्युलन्सने आणता आलं पाहिजे, हा आमचा हेतू आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा शेतीवर जातो, असं म्हणून मला हिणवलं. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवला, असा टोमणा मला मारला. आता मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही हा मुख्यमंत्रीच बदलून टाकला. सरकार बदललं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

माणूस चुकतो तेव्हा चूक सुधारतो, तो त्याच्या मनाचा मोठेपणा असतो. पण मीच बरोबर बाकीचे चूक असं कसं होऊ शकतं. एक माणूस चुकेल, दोन माणसं चुकतील, पण पन्नास माणसं कशी चुकू शकतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच आम्ही रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत नाही, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

दरम्यान, अंधश्रद्धा अनिष्ट प्रथांवरूनही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. प्रबोधनकार ठाकरेंनी अनिष्ट प्रथांना नेहमीच विरोध केला. मात्र त्यांचे वारसदार मात्र लिंबाटिंबाची भाषा करत आहेत. आमला आठवतेय की, आम्ही वर्षा बंगल्यावर नंतर गेलो. मात्र तिथे गेलो तेव्हा आम्हाला पाटीभर लिंबू सापडली. वेगवेगळ्या प्रकारची लिंबू होती. अशा लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली आहे, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे