शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:53 IST

शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.

औरंगाबाद-

शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. "संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घेतात. त्यांचा एखाद्या तरी मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा. या लोकांनी कधी ढेकूण तरी मारला आहे का? आमच्यासोबतच्या चार महिला आमदारांना हे लोक वेश्या म्हणतात. असं बोलणाऱ्यांना लोक जोड्यानं मारतील", अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. 

संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांच्यावर जोरदार शरसंधान केलं. तसंच आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. सत्ता असूनही मतदार संघातील कामं रखडल्याचंही ते म्हणाले. "मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे आम्हाला भेट देत नव्हते. अनेक निवेदनं देऊनही काहीच कार्यवाही होत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या निवेदनावर काही आदेश दिलेले नसल्याचं अधिकारी आम्हाला सांगायचे. त्यामुळे आमच्या मतदार संघातील कामं खोळंबत होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कामं मात्र वेगानं होत होती. मग आमदारांमध्ये नाराजी पसरणार नाही, तर आणखी काय होईल?", असं संजय शिरसाट म्हणाले. 

संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल"आज प्रवक्ते बाजू मांडतात ते नवीन आलेले आहेत. कधीही झेंडा हातात न घेतलेले लोक आम्हाला शहाणपणा शिकवतात. काल आलेले लोक आम्हाला शिवसैनिकांना शिकवत आहेत. ३७ वर्ष शिवसेनेत खूप चांगलं काम केलं. आम्ही लढून शिवसेना जनसामान्यांमध्ये रुजवली. ३९ आमदार एकत्र आले ते बरं झालं. एकामेकांच्या भावना आम्हाला समजल्या. बंडखोरी केली तेव्हा भविष्याचा विचार केला नाही. कारण सत्तेत राहून कामच होणार नसतील तर थांबण्याचा काय उपयोग", असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच बंडखोरी होऊ नये असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं गेलं नाही. उलट अरेरावीची भाषा झाली, असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Rautसंजय राऊत