पुस्तके खरेदी न करणा-या मुख्याध्यापकाला ‘शो-कॉज’नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 02:16 IST2016-10-17T02:16:40+5:302016-10-17T02:16:40+5:30

वाशिम तालुक्यातील वाचन प्रेरणा दिनासाठी पुस्तकांची खरेदीच नाही केली.

'Show-Cause'notis' headmaster who does not buy books | पुस्तके खरेदी न करणा-या मुख्याध्यापकाला ‘शो-कॉज’नोटीस

पुस्तके खरेदी न करणा-या मुख्याध्यापकाला ‘शो-कॉज’नोटीस

वाशिम, दि. १६- वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांची खरेदी करण्यात आली नाही. हा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी आकस्मिक भेट दिली असता निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी शनिवारी गटशिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना ह्यशो-काजह्ण नोटीस बजावली आहे.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबरला ह्यवाचन प्रेरणा दिनह्ण म्हणून साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनी जिल्हा परिषद शाळांमध्ये पुस्तक व साहित्याचे वाचन करणे आवश्यक होते. या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी वाशिम तालुक्यातील काही शाळांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. झाकलवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता, वाचन कार्यक्रम आढळून आला नाही तसेच साहित्यही दिसून आले नाही. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी घाटे यांना देण्यात आले. त्यानुसार गटशिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

Web Title: 'Show-Cause'notis' headmaster who does not buy books