शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 20:02 IST

Shiv Sena MLA : राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे. 

मुंबई : शिवसेनेत बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार (Eknath Shinde) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असलेले आमदार, या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटिस बजावली आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. 

या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या दोन्ही गटातील ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे. 

आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे गटातील ३९ आमदारांना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. आदित्य ठाकरे विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

आदित्य ठाकरेंचे नाव आमदारांच्या यादीत का नाही? विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावानंतर, शिंदे गटाचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका केली, पक्षाच्या बाहेर मतदान केल्याबद्दल उद्धव गटाच्या १४ आमदारांवर निलंबनाची किंवा अपात्रतेची कारवाई करावी. मात्र त्या आमदारांच्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. यामागचे कारण स्पष्ट करताना भरत गोगावले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही. म्हणजेच शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केलेली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवण्यात आली नाही.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीएकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. तसेच सुनील प्रभू यांची पक्षाचे मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती केली. यानंतर शिंदे सभापतींकडे गेले आणि त्यांची पुन्हा शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भरत गोगावले यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रतिस्पर्धी गटांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेVidhan Bhavanविधान भवन