शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवं का? सर्वेक्षणात लोकांनी दिल्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 01:11 IST

महत्वाचे म्हणजे, आपणच खरी शिवसेना आहोत. यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, असा दावा शिदे गटाने केला आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षात मोठे बंड केले. या बंडात त्यांच्यासोबत एक-दोन नव्हे तर शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार सहभागी झाले होते. या यशस्वी बंडानंतर, 30 जूनरोजी भाजप (BJP) सोबत सरकार स्थापन करत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर, त्यांनी शिवसेना (Shiv Sena) या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर (Shiv Sena Symbol) दावा ठोकला आहे. यावर हे प्रकरण निवडणूक आयोगानंतर (Election Commission)नंतर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि आता पुन्हा निवडणूक आयोगात पोहोचले आहे. महत्वाचे म्हणजे, आपणच खरी शिवसेना आहोत. यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळायला हवे, असा दावा शिदे गटाने केला आहे. 

शिदे गटाच्या या दाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षते खालील घटनापीठाने ठाकरे यांचा अर्ज फेटाळला. तसेच, शिवसेना नाव आणि चिन्हावर कुणाचा अधिकार असायला हवा. याचा निर्णय निवडणूक आयोग करेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वेक्षणात समोर आला असा  रिझल्ट -शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवे का? असा प्रश्न एबीपी न्यूज सी-व्होटरने साप्ताहिक सर्वेक्षणात लोकांना विचारला होता. याचा धक्कादायक रिझल्ट समोर आला आहे. यात 51 टक्के लोकांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवे, असे म्हटले आहे. तर 49 टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. या सर्वेक्षणात एकूण 4,427 लोकांनी सहभाग घेतला होता. याच बरोबर, सर्वेक्षणाचा रिझल्ट हा पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारलेला आहे, असेही एबीपी न्यूजने म्हटले आहे.

तीन मुद्यांवर संघर्ष - उद्धव ठाकरे गट आणि राज्याच्या सत्तेत बसलेला एकनाथ शिंदे गट यांच्यात प्रामुख्याने तीन मुद्यांवर संघर्ष सुरू आहे. पहिला म्हणजे, खरी शिवसेना कोणती? दुसरा - पक्षाचे निवडणूक चिन्ह कुणाकडे राहील? तर दिसरा मुद्दा म्हणजे, शिंदे गट संवैधानिक आहे किंवा नाही? यातच आता, निवडणूक आयोक काय निर्मय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या सुनावणीनंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देत, याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी पत्र लिहिले होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना