लोकल गोंधळाचा नेटची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका
By Admin | Updated: July 10, 2016 13:36 IST2016-07-10T13:36:45+5:302016-07-10T13:36:45+5:30
पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.

लोकल गोंधळाचा नेटची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका नेटची परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना बसला. अणूशक्तीनगर इथे परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिट उशिरा पोहोचलेल्या ज्योति तिवारी आणि किरण तिवारी या जुळया बहिणींना परीक्षेला बसू दिले नाही.
पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. या दोन बहिणींसह काही विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप केला. ज्योति आणि किरण तिवारी या वकिल असून, आपण या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारसिक बोगद्याजवळ जलद लोकल खोळबल्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उतरुन चालतच दिवा स्थानक गाठले. तिथून धीम्या ट्रेनने त्या अणूशक्तीनगर इथे पोहोचल्या. पण उशीर झाल्याचे कारण सांगून पोलिसांनी त्यांना परिक्षास्थळी सोडले नाही.