पोलीस अधीक्षकाच्या निवृत्तीला छमछमचा ठेका!

By Admin | Updated: June 9, 2014 14:36 IST2014-06-09T02:45:13+5:302014-06-09T14:36:21+5:30

खालापूर येथील एका फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

Short-term contract for the retirement of the superintendent of police! | पोलीस अधीक्षकाच्या निवृत्तीला छमछमचा ठेका!

पोलीस अधीक्षकाच्या निवृत्तीला छमछमचा ठेका!

नवी मुंबई : खालापूर येथील एका फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची टीप मिळाल्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टाकलेल्या धाडीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नवी मुंबईतून (झोन-२) पोलीस अधीक्षकपदावरून निवृत्त झालेल्या सुरेश पवार यांच्या ‘कृतज्ञते’साठी ही पार्टी आयोजित केल्याची माहिती पुढे येत असून, मद्याचे पाट, मुजऱ्याचा ठेका आणि अश्लील अवस्थेत थिरकरणारी पावले बघून कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीसही स्तिमित झाले. या छमछम पार्टीतून पोलिसांनी १२ मुलींना ताब्यात घेतले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या कलोते गावाबाहेर धरणाशेजारी मुंबईतील ए.आर. खत्री यांचे फार्महाउस आहे. या फार्महाउसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या माहितीवरून खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी बी.पी. कल्लुरकर यांनी रात्री ११नंतर छापा घातला. या वेळी सुरेश पवारसह मिलिंद पंडित, दीपक चौधरी, अहमद खान, संजय चौधरी, शेखर देवळेकर, संजय कामत, समीर शिंदे, रवींद्र राजापूरकर, अब्दुल खिलल, सईद खान, राजेश श्रोप, चंदरपाल अगरवाल, दीपक छोडा, राजेश सबनानी (सर्व रा. मुंबई)
यांच्यासह १२ मुलींना ताब्यात घेतले.
दरम्यान, पवार यांच्यासह उर्वरित चार जणांकडे मद्यपान करण्याचा परवाना असल्याने कारवाई केली नसून, अन्य १२ मुली आणि ६ पुरुषांवर विनापरवाना मद्यपानासह अश्लील, असभ्य वर्तणुकीखाली कारवाई केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कल्लुरकर
यांनी दिली.
या धाडीत १ लाख १० हजार रुपये
आणि मद्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी यातील सर्व आरोपींना खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पुरुष आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा, तर मुलींना प्रत्येकी १२०० रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Short-term contract for the retirement of the superintendent of police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.