नगर पंचायतमार्फत ट्रॅक्टरची खरेदी
By Admin | Updated: December 11, 2014 17:18 IST2014-12-11T16:14:42+5:302014-12-11T17:18:52+5:30
अर्धापूर : शहरातील स्वच्छतेसंबंधित कामे वेळेवर व्हावीत व टंचाईकाळात जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायतने दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व दोन टँकर विकत घेतले आहेत़

नगर पंचायतमार्फत ट्रॅक्टरची खरेदी
अर्धापूर : शहरातील स्वच्छतेसंबंधित कामे वेळेवर व्हावीत व टंचाईकाळात जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायतने दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व दोन टँकर विकत घेतले आहेत़
अर्धापूर नगरपंचायतकडे असलेले ट्रॅक्टर जुने झाले असून नेहमी नादुरूस्त असल्यामुळे शहरातील वाढत्या वस्त्या, रस्ते, नाली व शहरीकरण यापासून उत्पादित होणारा कचरा संकलन करून वाहून नेण्यासाठी अडचण भासत होती़ तसेच शहरातील स्वच्छतेबाबतीत कामे वेळेवर होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरत होते़ याबाबत नागरिकांकडून वारंवार होत असलेल्या तक्रारी अनुषंगाने नगर पंचायतने सर्वसाधारण सभेत ट्रॅक्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला़
१३ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून २१ लाख ७० हजार किंमतीचे दोन ४२ एचपीचे ट्रॅक्टर, दोन पाच टनाच्या हायड्रॉलिक ट्रॉली व पाच हजार लिफ्ट क्षमतेचे दोन टँकर नगर पंचायतने विकत घेतले असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे नगर अभियंता पी़एऩपेन्सलवार यांनी दिली़
कोट
टँकरअभावी विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा टंचाई काळात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगर पंचायतला अडचण येत असल्याने यावेळी दोन टँकर विकत घेण्यात आले - आशुतोष चिंचाळकर, मुख्य अधिकारी, नगर पंचायत, अर्धापूऱ