संप करणा-या व्यापा-यांना गोळ्या घाला - रघुनाथदादा पाटील
By Admin | Updated: July 20, 2016 15:07 IST2016-07-20T13:33:01+5:302016-07-20T15:07:24+5:30
देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे.

संप करणा-या व्यापा-यांना गोळ्या घाला - रघुनाथदादा पाटील
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २० - देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे. सध्याचा शेतकरी स्वत:चा माल विकण्यास सक्षम असून याला बाजार समित्यांची गरज नाही. शेतक-यांच्या हिताच्या निर्णयाविरूध्द जर व्यापारी जात असेल तर त्या व्यापा-यांना गोळ्या घाला, लाठी चार्ज करा असे सडेतोड आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
शेतक-यांच्या विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतक-यांचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात भाकड जनावरेही आणण्यात आली होती.
पुढे बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, भाजप सरकार व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणत आहे़ स्वातंत्र्याची गळचेपी करणारे लोक सत्तेवर येतील असे कधीच वाटले नव्हतं. भाजप सरकारनं भारतीय घटनेचा सन्मान करीत शेतक-यांना न्याय देण्याचे काम करावं. पशुधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. भाकड जनावरं पाळण कठीण झालं आहे़ विकायला गेलो तर हिंदूत्ववादी संघटना व पोलीस प्रशासन संगनमत करून शेतक-यांची आर्थिक लूट करीत आहेत. आगामी काळात शेतक-यांच्या विरोधातील सरकारला पायउतार करण्यासाठी शेतकरी संघटना काम करणार आहे असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.