Shocking ... The youth commits suicide by jumping over the Mumbai airport building | धक्कादायक... मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी मारत तरुणाची आत्महत्या
धक्कादायक... मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

मुंबई : मंत्रालयामध्ये आत्महत्या केल्याची घटना ताजीच असताना आज एका तरुणाने राज्यातील दुसऱ्या सुरक्षित अशा मुंबईविमानतळावर आत्महत्या केल्याची घटना घडली. 


पोलिस निरिक्षक रघुनाथ कदम यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या 31 वर्षांच्या तरुणाने सकाळी 6.45 वाजता मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या बॅगेत चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असे लिहिलेले आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  
 


Web Title: Shocking ... The youth commits suicide by jumping over the Mumbai airport building
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.