धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

By Admin | Updated: April 25, 2017 16:19 IST2017-04-25T16:18:46+5:302017-04-25T16:19:38+5:30

दहा दिवसाच्या चिमुरडीस विष पाजून फरार झालेल्या या नराधम बापाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

Shocking ... as a ten-day-old little girl, | धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 25 : मुलगाच हवा होता, पण दैवाने दुसरीही मुलगीच पदरात टाकली. दहा दिवसाच्या या नकोशीला क्रूर बापाने विष पाजले, सध्या ही चिमुरडी मृत्यूशी झुंज देत आहे. चीड आणणारी ही घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. दहा दिवसाच्या चिमुरडीस विष पाजून फरार झालेल्या या नराधम बापाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.  हिंगोलीतील वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रामकिशन शिवाजी जाधव (२४) याचा विवाह चार वर्षांपूर्वी अंजना (२३) हिच्याशी झाला. त्यांना पहिले अपत्य मुलगी झाली. सध्या ही मुलगी ऋतुजा अडीच वर्षांची असून, दहा दिवसांपूर्वी दुसरी मुलगीच झाली. रामकिशनला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्याने चिडलेला रामकिशन पत्नी व १० दिवसांच्या वैष्णवी हिला भेटण्यासाठी रविवारी दुपारी ३.३०च्या सुमारास वाघी येथे सासुरवाडीला आला.
तेथे त्याने वैष्णवीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी तिला तातडीने विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अंजनाने दिलेल्या फिर्यादीवरून रामकिशनविरूद्ध कलम ३०७ नुसार कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking ... as a ten-day-old little girl,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.