धक्कादायक! चोरांनी कुुटुंबातील चौघांची केली हत्या
By Admin | Updated: March 20, 2017 11:44 IST2017-03-20T08:28:28+5:302017-03-20T11:44:21+5:30
चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरटयांनी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे.

धक्कादायक! चोरांनी कुुटुंबातील चौघांची केली हत्या
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरटयांनी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप सुरेश भोळे, वय 42, संगीता प्रदीप भोळे, वय 35 , दीव्या भोळे, 9 वर्ष, चेतन भोळे, 5 वर्ष असे खून झालेल्या चौघांची नावे आहेत.
भोळे यांनी नुकतीच चार लाखामध्ये त्यांची शेती विकली होती. पैशांसाठी हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून झालेले प्रदीप भोळे स्वयंपाकी कारागीर होते. शेत विक्रीतून मिळालेल्या पैशातून ते भादली गावात हॉटेल सुरु करणार होते.