शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आंबेगाव तालुक्यात उसाच्या शेतात बिबट्याची पाच बछडे जळून मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:09 IST

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणीसाठी शेतात असलेला पालापाचोळ्याला आग लावली जाते.

आंबेगाव : अवसरी बुदु्रुक (ता आंबेगाव) येथे उसाच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले जळून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसरात बिबट्याच्या बछड्यांच्या आगीत जळुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणीसाठी शेतात असलेला पालापाचोळ्याला आग लावली जाते. अशाच एका घटनेत अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुणगे यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले असताना काही ठिकाणी उसाच्या शेतातील पालपाचोळ्याला आग लावली. दरम्यान या उसाच्या पाचुट जळत असताना बिबट मादीची पाच पिल्ले दडून बसली होती. आगीच्या दाहाने बिबट्या मादी समोरील उसाच्या शेतात पळून गेल्याचे ऊस तोडणी कामगारांनी पाहिले. परंतु, बिबट्याची पिल्ले छोटी असल्याने या बिबट्यांच्या पिल्लांनाचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. बिबट्या मादीची चिमुकली पिल्ले आगीत जळुन मृत्यु झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी क्रोधित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी पुढील काळात सतर्क राहण्याची गरज आहे. ऊस शेतीला जंगल समजून बिबट्या उसाच्या शेतात वास्तव्य करत असताना  बिबट्या मादीची पिल्लेही ऊस शेतीचा आधार घेऊन वास्तव्य करत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बिबट्याच्या व बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वनविभाग या घटनेकडे कशा पद्धतीने पाहणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या घटनेचे माहिती प्रशांत वाडेकर यांनी तात्काळ अवसरी वनपाल एस. पी. शिंदे यांना तात्काळ माहिती कळविली,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे,मंचर वनपाल व्ही. आर. वेलकर,अवसरी वनपाल एस. पी. शिंदे,पोलीस पाटील माधुरी शिंदे यांनी पंचनामा केला.अवसरीचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली असून बिबट्याची मादी ही पिलांच्या शोकात चवताळून या परिसरातील नागरिकांवर हल्ला करू शकते.

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्याforest departmentवनविभागfireआग