शोभा राऊत यांना न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: July 20, 2014 01:25 IST2014-07-20T01:25:30+5:302014-07-20T01:25:30+5:30

मावेजाची मंजूर रक्कम देण्यासाठी कौडगाव येथील शेतक:यांकडून 39 हजार 2क्क् रूपये लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली़

Shobha Raut gets judicial custody | शोभा राऊत यांना न्यायालयीन कोठडी

शोभा राऊत यांना न्यायालयीन कोठडी

उस्मानाबाद : मावेजाची मंजूर रक्कम देण्यासाठी कौडगाव येथील शेतक:यांकडून 39 हजार 2क्क् रूपये लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली़ दरम्यान, प्रकृती ठिक नसल्याने वकिलामार्फत न्यायालयात अर्ज करून त्यांनी रूग्णालय गाठले होत़े रात्री उशिरार्पयत त्या वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयातच होत्या़ 
शनिवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  राऊत यांच्या वकिलांनी यावेळी जामिनासाठी अर्ज केला होता़ त्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आह़े 
तर राऊत यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पुन्हा अर्ज केला़ त्यामुळे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूगणालयात नेण्यात आले होत़े (प्रतिनिधी)
 
91 लाख जप्त : उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्या बीड, परभणी, उस्मानाबाद आदी विविध ठिकाणी असलेल्या बँक खाते, घर, लॉकर्सची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कसून तपासणी केली. त्यात रोख रक्कमेसह दागिने, एलआयसी, बचत प्रमाणपत्रे, एफडी आदी 91 लाख 36 हजार रूपये जप्त करण्यात आल्याची उस्मानाबादच्या माहिती उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली़
राऊत गावाकडे फिरकल्या नाहीत! : शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून महसूल प्रशासनात काम करणा:या शोभा राऊत यांनी 1991-92 नंतर गावाकडे फिरकल्याच नसल्याचे तेथील पथकाने केलेल्या कारवाईत समोर आल़े त्यामुळे राऊत यांच्या नावावर अहमदनगर येथे कोणतीच प्रॉपर्टी नसल्याचे पोलिसांनी सांगितल़े

 

Web Title: Shobha Raut gets judicial custody